कोरोना : जगभरातील लोक एकमेकांना असे देत आहेत प्रोत्साहन

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. या महामारीमुळे अनेक शहर लॉकडाउन करण्याची वेळ आली आहे. लोक घरून काम करत आहेत. अशा परिस्थितीत नागरिक एकमेकांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम करत आहेत.

भारतात कोरोनाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी लोकांना जनता कर्फ्यूमध्ये सहयोग देण्याचे आवाहन केले आहे. मोदींनी लोकांना आवाहन केले आहे की, गरज असेल तरच घराच्या बाहेर पडा. तसेच, रविवारी सायंकाळी 5 वाजता 5 मिनिटांसाठी घराची बाल्कनी आणि छतावर येऊन जे लोक घरून काम करू शकत नाही, अशांना प्रोत्साहन देण्यासाठी टाळ्या वाजवाव्यात.

अशाच प्रकारे जगभरातील अनेक भागांमध्ये लोक एकमेकांचा उत्साह वाढवत आहेत. स्पेनमध्ये रात्री 10 वाजता सर्व नागरिक आपल्या घराच्या खिडकीत येत कोरोनाशी लढणाऱ्या आरोग्य कर्मचारी आणि संसर्ग झालेल्या लोकांसाठी टाळ्या वाजवत आहेत.

इटलीमध्ये देखील अशाच प्रकारे लोक घराचे बाहेर येऊन आरोग्य कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवत आहेत. इस्त्रालयचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी देखील नागरिकांसोबत मिळून अशाच प्रकारे आरोग्य कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवला.

Leave a Comment