पुण्यातील मार्केटयार्ड आजपासून तीन दिवस बंद


पुणे – पुण्यातील मार्केटयार्ड कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी तीन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. 20, 21 आणि 22 मार्चला मार्केटयार्ड बंद ठेवण्याचा निर्णय आडते असोसिएशनच्या वतीने घेण्यात आला. हा बंद आजपासून सुरू झाला असून मार्केटयार्डमध्ये फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळण्यास सुरुवात केली आहे.

हा बंद सुरुवातीला 20 आणि 21 मार्च रोजीच पाळण्यात येणार होता, पण गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘जनता कर्फ्यु’चे आवाहन केल्यानंतर बंद आणखी एक दिवस वाढवण्यात आला. संपूर्ण पुणे शहराला छत्रपती शिवाजी महाराज मार्केटयार्डमधून भाजीपुरवठा करण्यात येतो. मार्केट बंद असल्याने आता पुणेकरांची गैरसोय होणार आहे. पण कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ही खबरदारी घेणे गरजेचे आहे.

Leave a Comment