कोरोना : गुगलने डुडलच्या माध्यमातून केले हात धुण्याविषयी जागृक

सर्च इंजिन गुगल वेगवेगळ्या क्षणी व खास इव्हेंटच्या निमित्ताने होमपेजवर डुडल बनवून लोकांना अभिवादन करत असते. कोरोना व्हायरसच्या निमित्ताने गुगलने असेच एक खास डुडल बनवत लोकांना हात धुण्यास जागृक करण्याचा प्रयत्न केला आहे.

‘फादर ऑफ इंफेक्शन कंट्रोल’ नावाने ओळखले जाणारे हंगेरीची डॉक्टर इग्नॅज सेम्मलवीज यांचे डुडल गुगलने बनवले आहे. डॉक्टर इग्नॅज यांच्या डुडलद्वारे गुगल लोकांना हात धुण्यास जागृक करत आहे.

हंगेरीचे फिझिशियन इग्नॅज यांनी सर्वात प्रथम हात धुण्याचे फायदे सांगितले. 20 मार्च 1847 ला इग्नॅज यांनी व्हियना जनरल हॉस्पिटलच्या मॅटरनिटी क्लिनिकमध्ये हात स्वच्छ ठेवण्याविषयी जोर दिला. ते या क्लिनिकमध्ये चीफ रेजिडेंट बनविण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी सर्व फिझिशियन्सचे हात क्लोरिनेटेड लाइम सोल्यूशनच्या मदतीने डिसइंफेक्ट करण्यास सांगितले.

त्यावेळी आई बनणाऱ्या महिला मोठ्या संख्येत इंफेक्शन आणि डिलिव्हरीनंतर येणाऱ्या तापामुळे प्राण गमवावे लागत होते. याद्वारे इग्नॅज यांच्या लक्षात आले की अनेक डॉक्टर व्यवस्थित हात धुवत नसल्याने संक्रमित आजार इतरांपर्यंत पोहचत आहेत. याच कारणामुळे आई होणाऱ्या महिलांना संसर्ग होत होता.

या गोष्टीची माहिती मिळताच इग्नॅज सहकारी डॉक्टरांवर नाराज झाले व स्वच्छतेची काळजी न घेतल्याने त्यांच्यावर हत्येचा आरोप केला. त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये देखील दाखल करण्यात आले. तेथेच त्यांचा मृत्यू झाला.

इग्नॅज यांच्या मृत्यूनंतर हात धुवणे किती गरजेचे आहे, हे समोर आले. याच त्यांच्या कामाचा उल्लेख करत गुगलने डुडलद्वारे त्यांना सन्मानित केले आहे व कोरोना व्हायरसपासून बचावासाठी हात धुवणे किती गरजेचे आहे हे सांगितले आहे.

Leave a Comment