इअरफोन खरेदी करण्याआधी या गोष्टी लक्षात ठेवा

सध्या बाजारात हजारो इअरफोन असल्याने, कोणता खरेदी करावा असा प्रश्न पडतो. चुकीच्या इअरफोनमुळे तुमच्या कोणावर देखील वाईट परिणाम होऊ शकतो. तुमच्या कानाला नुकसान पोहचू शकते. त्यामुळे इअरफोन खरेदी करताना चांगल्या गुणवत्तेचे हेडफोन खरेदी करावे.

Image Credited – Amarujala

इन इअर हेडफोन्स अथवा इअरफोन्स –

इन इअर हेडफोन्सला इअर मॉनिटर देखील म्हटले जाते. या हेडफोन्सला असे डिझाईन केले जाते की ते सहज कानाच्या आत फिट होतात. हे हेडफोन्स कानाच्या पडद्याजवळ असल्याने चांगली साउंड क्वालिटी मिळते. सोबतच हे बाहेरच्या आवाजाला आत येण्यापासून रोखतात. चुकीच्या आकाराच्या इअरफोनमुळे ऑडिओच्या गुणवत्तेवर परिणाम होतो.

Image credited – Medical Xpress

ओव्हर इअर हेडफोन्स –

ओव्हर इअर हेडफोन्समुळे कान पुर्णपणे झाकले जातात. याच्या मोठ्या आकारमुळे यातून चांगला आवाज व बास येतो. या हेडफोन्समधून स्पीकरसारखी साउंड क्वॉलिटी मिळते. पुर्ण कान झाकले असल्याने, बाहेरील आवाज देखील खूप कमी येतो.

Image Credited – Headphonesty

ओपन आणि क्लोज्ड बॅक हेडफोन्स –

अनेकदा हेडफोन्सच्या स्पेसिफिकेशन्समध्ये ओपन बॅक आणि क्लोज्ड बॅक पाहण्यास मिळते. याचा अर्थ हेडफोनचा मागील भाग उघडा अथवा सील केलेला असतो. क्लोज्ड बॅक हेडफोनद्वारे चांगली साउंड क्वॉलिटी मिळते व आजुबाजूच्या आवाजाचा देखील परिणाम होत नाही. ओपन बॅक हेडफोन्समुळे नेच्युरल साउंड मिळतो.

Image Credited – Make Tech Easier

ड्राइव्हर –

ड्राइव्हर हेडफोनचा सर्वात महत्त्वपुर्ण भाग असतो. ड्राइव्हरच इलेक्ट्रिक सिग्नलला साउंड प्रेशरमध्ये बदलतो. वेगवेगळे ड्राइव्हर असले तरी सर्वांमध्ये चुंबक, वॉइस कॉइल्स आणि डायफ्राम असतात. जेवढा मोठा ड्राइव्हर असतो, तेवढी चांगली हेडफोनची क्वॉलिटी असते. अनेक ब्रँड्समध्ये आता ड्युअल ड्राइव्हरचा प्रयोग केला जातो.

Image Credited – Amarujala

सेंसिटिव्हिटी आणि साउंड प्रेशर लेव्हल –

सेंसिटिव्हिटी आणि साउंड प्रेशर लेव्हलला एसपीएल देखील म्हटले जाते. हेडफोनचा आवाज किती असेल हे एसपीएलवर अवलंबून असते. सेसिंटिव्हिटीचा अर्थ हेडफोन इलेक्ट्रॉनिक सिग्नलला ध्वनिक सिग्नलमध्ये बदलण्यास किती सक्षम आहे. बाजारात येणारे अधिकांश हेडफोन्स 85 -120 dB SPL/mW मध्ये येतात.

Image Credited – Elite Daily

फ्रीक्वेंसी रिस्पॉन्स –

फ्रीक्वेंसी रिस्पॉन्सचा अर्थ हेडफोन किती ऑडिओ फ्रीक्वेंसी निर्माण करू शकतो. याला हर्ट्जमध्ये मोजले जाते. फ्रीक्वेंसी जेवढी कमी असेल, तेवढा बास कमी असेल. बाजारातील हेडफोन्स 20-20,000Hz च्या मध्ये फ्रीक्वेंसी रिस्पॉन्स देतात.

Leave a Comment