कोरोनाची माहिती लपविल्याप्रकरणी कनिका कपूरला होऊ शकते शिक्षा


बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूरची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आल्यापासून सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. कनिकासह आणि 4 रुग्ण देशात वेगाने पसरत असलेल्या कोरोना व्हायरसचे सापडले आहेत. पण आता सोशल मीडियाच्या माध्यमातून कनिकाची टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर तिला अटक करण्याची मागणी होत आहे. कारण तिने लंडनवरुन परतल्यानंतर एक पार्टी केली होती. ज्यामुळे तिच्यावर कोरोना पसरवल्याचा आरोप केला जात आहे. कनिका कपूर ही बॉलिवूडमध्ये अधिकृतरित्या कोरोना पॉझिटीव्ह असलेली पहिलीच सेलिब्रेटी आहे.

बॉलिवूडमधील सर्वच सेलिब्रेटी कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी घरात राहण्याचा सल्ला देत आहेत, त्याचबरोबर काही दिवसांसाठी सेलिब्रेटींनीही त्यांची शूटिंग देखील थांबवली आहे. पण भारतात 10 दिवसांपूर्वी परतलेल्या कनिकाने स्वतःला क्वारंटाइन केले नाही तर तिने चक्क एका पार्टीत उपस्थिती देखील दर्शवली होती. काही सूत्रांच्या माहितीनुसार जेव्हा लंडनवरुन कनिका परतली त्यावेळी ती तपासणीपासून वाचण्यासाठी एअरपोर्टच्या बाथरुममध्ये लपली होती.

कनिकाच्या या वागण्यामुऴे लोकांचा राग आता अनावर झाला आहे. लोकांच्या आरोग्याशी खेळ केल्याबाबत कनिकाला अटक करण्याची मागणी सोशल मीडियावर केली जात आहे. लेखक तुहिन सिन्हा यांनी लिहिले, श्री योगी आदित्यनाथजी यांच्याकडे मी कनिका कपूर अ‍ॅपिडेमिक अ‍ॅक्ट 1897 च्या कलम 2 खाली कारवाई करण्यात यावी. जो पर्यंत आपण कठोर कारवाई करणार नाही, तोपर्यंत कोरोना व्हायरस विरोधातील ही लढाई आपण जिंकू शकत नाही. असे झाल्यास कनिकाला 6 महिन्यांचा तुरुंगवास आणि दंड किंवा दोन्ही होऊ शकतो.

Leave a Comment