स्पर्श केल्याने होतो का कोरोना ?

कोरोना व्हायरसचा प्रसार दिवसेंदिवस वाढत चालला असून, भारतात या व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या 200 च्या पुढे गेली आहे. या व्हायरसच्या संसर्गपासून वाचण्यासाठी लोक स्वतःला घरात बंद करून घेत आहेत. या व्हायरस संबंधी लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत, त्यातील काही प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.

शाळा बंद करून काय फायदा?   

कोव्हिड-19 मुळे शाळा बंद होणे हे वैज्ञानिक आणि व्यवाहारिक दृष्टीने देखील अवघड विषय आहे. शाळा बंदचा सर्वाधिक परिणाम मुलांवर होतो. मात्र हे आजारापासून वाचण्यासाठी महत्त्वाचे आहे. मुलांना घरात ठेवल्याने ते गर्दीच्या ठिकाणी जाण्यापासून वाचतात व यामुळे लोकांच्या संपर्कात कमी येतात.

एकत्र आल्याने वाढतो व्हायरस –

असंख्य लोक एकत्र आल्याने व्हायरस पसरतो. कॉलेज सारख्या ठिकाणी एकमेंकाच्या संपर्कामुळे मित्र, नातेवाईक व जवळच्या व्यक्तींना देखील या व्हायरसचा संसर्ग होऊ शकतो.

वृद्ध आणि बेघरांना सर्वाधिक धोका –

या महामारीच्या विळाख्यात सर्वात प्रथम वृद्ध आणि बेघर लोक येतात. या लोकांना संक्रमण होण्याचा अधिक धोका आहे. जर एखाद्या आरोग्य कर्मचाऱ्याला या व्हायरसचा संसर्ग झाला असल्यास त्याच्याद्वारे इतरांना या व्हायरसची लागण होण्याचा धोका वाढतो. याशिवाय वृद्धांमध्ये रोग-प्रतिकार क्षमता देखील कमी असते.

स्पर्श केल्याने पसरतो व्हायरस ?

जर एखाद्या कोव्हिड-19 रुग्णाला खोकला, ताप असे काहीच लक्षण नसतील तरी त्या व्यक्तीच्या स्पर्शाने व्हायरसचा प्रसार होतो का ? असा प्रश्न लोकांच्या मनात आहे. तर याचे उत्तर हो असे आहे. असे लक्षण दिसत नसले तरी स्वतःला समाजात मिसळण्यापासून काही दिवस लांब ठेवा. काही लोकांमध्ये या व्हायरसचे लक्षण दिसण्यास वेळ लागतो.

Leave a Comment