आर्थिक फसवणूक प्रकरणी अभिनेते विक्रम गोखलेंविरोधात गुन्हा दाखल


पुणे : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्यासह तिघांवर पुण्यात मुळशी तालुक्यातील डोंगरगाव मधील जमिनीची स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदा विक्री करुन 14 जणांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ९६ लाख ९९ हजार रूपयांची फसवणूक झाल्याची तक्रार जयंत बहिरट यांनी केली होती. या तिघांविरोधात त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जयंत म्हाळगी आणि सुजात म्हाळगी यांनी २५ वर्षांपूर्वी सुजाता फार्म प्रा. लिमिटेड स्थापन करुन ‘गिरीवन प्रोजेक्ट’ कंपनीची स्थापना केली होती. विक्रम गोखले हे गिरीवन प्रोजेक्टचे अध्यक्ष आहेत. हा प्रकल्प सरकारमान्य असल्याचे सांगत त्यांनी खोटी प्रलोभने देऊन ग्राहकांना आकर्षित केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

96 लाख 99 हजार रुपयांची विक्रम गोखले यांच्यासह तिघांनी फसवणूक केल्याची तक्रार जयंत प्रभाकर बहिरट यांनी दिली होती. त्यानुसार अभिनेते विक्रम चंद्रकांत गोखले, जयंत रामभाऊ म्हाळगी, सुजाता जयंत म्हाळगी यांच्यावर पुण्यातील पौड पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave a Comment