अंतराळातून पृथ्वीवरील मोबाईलवर आला पहिला एसएमएस


फोटो सौजन्य नवभारत टाईम्स
मोबाईल कम्युनिकेशन अधिक प्रभावी बनविण्याचा एरोस्पेस स्टार्टअप कंपनी लिंक (LYNK)चा प्रयोग यशस्वी झाला असून यात स्पेस मधून पृथ्वीवर एका अँड्राईड स्मार्टफोनवर एसएमएस पाठविण्यात आला. यासाठी पृथ्वीजवळच्या एका उपग्रहाचा वापर केला गेला.

कंपनीचे सीईओ आणि सहसंस्थापक चार्ल्स मिलर यांच्या म्हणण्यानुसार याचा फायदा पृथ्वीवरील ५०० कोटी पेक्षा अधिक स्मार्टफोन धारकांना ब्रॉडबँड सेवा देण्याची जी योजना राबविली जात आहे ती लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी होऊ शकणार आहे. ज्या युजरकडे स्वस्त इंटरनेट कनेक्शन ऑप्शन नाही त्यांच्यासाठी हे फारच उपयोगी ठरणार आहे. पूर्ण मोबाईल कम्युनिकेशन इंडस्ट्री साठी हे यश गेमचेंजर ठरू शकेल.

चार्ल्स गेली ३० वर्षे स्पेस इंडस्ट्रीत काम करत आहेत आणि लिंक स्टार्टअप सुरु करण्यापूर्वी ते नासा मध्ये वरिष्ठ अधिकारी होते. त्यांनी अंतराळातून पृथ्वीवरील मोबाईलवर एसएमएस पाठविण्याचा पहिला प्रयोग २४ फेब्रुवारी रोजी केला तो यशस्वी झाला. त्यानंतर त्याचा अनेकदा चाचण्या घेतल्या गेल्या. या तंत्रज्ञानाचे पेटंट घेतले गेले आहे. या तंत्रज्ञानामुळे मोबाईलच्या हार्डवेअर अथवा सोफ्टवेअरशी छेडछाड न करता लो अर्थ ऑर्बीट नॅनो सॅटेलाईटच्या मदतीने जगात कुठेही व्हर्चुअली कनेक्टेड राहणे शक्य होणार आहे.

ही सेवा व्यावसायिक पातळीवर लाँच करण्याचे काम सुरु असून त्यासाठी ३० मोबाईल नेटवर्क ऑपरेटर बरोबर भागीदारी करार केला गेला आहे असे समजते. भारतात ही सेवा वर्षअखेरी मिळू शकेल आणि लाखो लोक त्याचा फायदा घेऊ शकतील असे चार्ल्स यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment