राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात वाढ


मुंबई – कोरोनावर आळा घालण्यासाठी राज्य सरकार अनेक उपाय योजना राबवत असल्यातरीही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशातच मुंबई आणि उल्हासनगरमधील प्रत्येकी एका महिलेला कोरोनाची लागण झाल्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा 47 वर पोहोचला आहे

इंग्लंडवरुन मुंबईतील 22 वर्षीय महिला परतली आहे. तिला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. तर उल्हासनगरमधील 49 वर्षीय महिला दुबईवरुन आली असून, तिला सुद्धा कोरोनाची बाधा झाली आहे. पुणे, मुंबई, यवतमाळ, औरंगाबाद, नागपूर, कल्याण या ठिकाणी कोरोनाचे रुग्णांमध्ये वाढ होत आहे. नुकतेच रत्नागिरीत कोरोनाचा एक रुग्ण आढळला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अल्पशा लॉकडाऊन लागू केले आहे. पण तरी देखील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

Leave a Comment