ओ स्त्री…च्या जागी येथे लागले ‘ओ कोरोना, कल आना’चे हटके पोस्टर

हिंदी चित्रपट स्त्री तुम्ही पाहिला असेल तर त्यातील ‘ओ स्त्री, कल आना’ हा डायलॉग नक्की आठवत असेल. आता याच डायलॉगचा वापर वाराणसीचे लोक कोरोना व्हायरससाठी करत आहेत. शहरातील मंदिरांच्या भिंतींवर चक्क ‘ओ कोरोना, कल आना’चे पोस्टर लागले आहेत.

या पोस्टरमुळे कोरोना व्हायरस लांब राहत नसला तरी देखील स्थानिक लोक मात्र या पोस्टरचा आनंद घेत आहेत. या पोस्टरसोबत फोटो देखील काढत आहेत.

हे पोस्टर पुनीत मिश्रा नावाच्या व्यक्तीद्वारे लावण्यात आलेले आहेत. लोकांमध्ये जागृकता आणण्यासाठी त्यांनी हे पोस्टर लावले आहेत.

मिश्रा म्हणाले की, पोस्टर कोरोनासंबंधी लोकांमध्ये वेगळा विचार निर्माण करते. त्यांना विशेष काळजी घेण्यासाठी प्रेरित करते. यामुळे त्यांच्यात उत्साह निर्माण झाला असून, माझा उद्देश पुर्ण झाला आहे.

Leave a Comment