जाणून घ्या सरकारच्या योजनेंतर्गत मिळत असलेल्या मोफत मास्क मागील सत्य

कोरोना व्हायरसच्या प्रसारासोबतच त्या संबंधी अफवांचा प्रसार देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होत आहे. विविध खोटे दावे असणारे मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सध्या असाच एक मेसेज व्हायरल होत असून, यात सरकार पीएम मास्क योजनेंतर्गत मोफत मास्क वाटत आहे, असा दावा करण्यात आला आहे.

Image Credited – social media

व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये लिहिले आहे की, कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रकोपामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या अंतर्गत सर्व भारतीयांना कोरोना व्हायरस मुक्त मास्क देण्याचा निर्णय घेतला आहे. खालील दिलेल्या लिंकवर मोफत मास्क ऑर्डर करा व स्वच्छ भारताचा भाग बना.

प्रेंस इंफॉर्मेशन ब्यूरोने ट्विट करत हा मेसेज फेक असल्याचे स्पष्ट केले असून, सरकार असली कोणतीही योजना चालवत नसल्याचे सांगितले आहे. असे कोणतेही मेसेज फॉरवर्ड करू नका व लिंकवर देखील क्लिक करू नका.

Leave a Comment