कोरोना व्हायरसला ट्रॅक करण्याच्या प्रयत्नात फेसबुक-गुगल

टेक्नोलॉजीच्या क्षेत्रातील दिग्गज कंपन्या गुगल आणि फेसबुक कोरोना व्हायरसला ट्रॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी दोन्ही कंपन्या अमेरिकन सरकारशी संवाद साधत आहेत. जेणेकरून, ते देखील लोकांच्या वैयक्तिक माहितीद्वारे या व्हायरसशी लढण्यासाठी पुढे येऊ शकतील.

या प्रोजेक्टद्वारे अमेरिकन लोकांची ओळख लपवून त्यांचे लोकेशन ट्रॅक केले जाईल व त्यांना स्मार्टफोनद्वारे ट्रेस करण्यात येईल. व्हायरसचा प्रसार कोणत्या भागात झाला आहे, हे याद्वारे लक्षात येईल.

गुगलचे प्रवक्ते जॉनी लू यांनी सांगितले की, लोकांची ओळख गुप्त ठेवली जाईल व लोकेशन ट्रेस करण्यात येईल. याची तयारी सुरू आहे.

अमेरिकेवर या व्हायरसशी लढण्यासाठी दबाव वाढला आहे. 50 पेक्षा अधिक वैज्ञानिकांनी या संदर्भात सरकारला प्रयत्न देखील लिहिले आहे. तंत्रज्ञान कंपन्यांनी सहकार्य केल्यास संक्रमण रोखण्यास मदत होईल, असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.

Leave a Comment