
पुणे – जगभराला आपल्या विळख्यात घेतलेल्या कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत असून आज आणखी एक कोरोनाग्रस्त पुण्यात आढळल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुण्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या १८ वर पोहचली असून महाराष्ट्रातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता ४२ वर गेली आहे.
पुण्यात आढळला आणखी एक कोरोनाग्रस्त; राज्यातील संख्या ४२ पार
कोरोनाची लक्षणे एका २८ वर्षीय महिलेमध्ये दिसून आली आहेत. ती 15 मार्चला फ्रान्स आणि नेदरलँड या देशांमधून प्रवास करून भारतात आली होती. तिला मंगळवारी (17 मार्च) कोरोनाची लक्षणे आढळल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर झाले आहे. फ्रान्स आणि नेदरलँड या देशातून आलेला एक प्रवाशी पॉझिटिव्ह सापडला आहे.
दरम्यान, महाराष्ट्र कोरोना बाधित रुग्णांमध्ये सध्या अव्वल स्थानी आहे. आतापर्यंत ४२ रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. यामध्ये 3 परदेशातील रुग्णांचा समावेश आहे. तर महाराष्ट्रात आतापर्यंत एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
