कोरोनापासून बचाव करण्यासाठी शक्यतो करा डिजिटल व्यवहार

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी नोटांपासून लांब राहण्यास सांगितले आहे. आरबीआयने स्पष्ट केले की, नोटांना संक्रमणापासून वाचविण्याची कोणतीच पद्धत नाही. लोकांना नोटांच्या संपर्कापासून स्वतःलाच वाचवावे लागेल. यासाठी डिजिटल व्यवहार सर्वात चांगला मार्ग आहे.

चीन, इटली आणि जपानच्या बँकेंतील नोटांपासून कोरोना व्हायरसचा प्रसार झाल्याने जागतिक आरोग्य संघटनने जगभरातील केंद्रीय बँकांनी सुचना पाठवल्या आहेत. आरबीआयने सर्व बँकांना नागरिकांना डिजिटल व्यवहार करण्यास प्रेरित करावे, असे सांगितले आहे.

रोख रक्कमेमुळे व्हायरस एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर आणि एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे स्थानांतरित होत आहे. सार्वजनिक ठिकाणी जाण्यापासून वाचण्यासाठी मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, कार्ड सारख्या ऑनलाईन माध्यमांद्वारे डिजिटल व्यवहार करावे. जेणेकरून वारंवार नोटांना स्पर्श करण्यापासून वाचता येते.

कोरोनाच्या संसर्गपासून वाचण्यासाठी नोटांचे व्यवहार जेवढा शक्य असेल तेवढा कमी करून, डिजिटल व्यवहार करावा, असे आरबीआयकडून सांगण्यात आले आहे.

Leave a Comment