राज्यात आता वर्क फ्रॉम होम – राजेश टोपे


मुंबई – राज्य सरकारकडून वेगवेगळी पावले कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उचलण्यात येत आहेत. हा व्हायरस गर्दीमुळे अधिक पसरण्याची शक्यता असल्यामुळे गर्दी अजून कशी कमी करता येईल यावर राज्य सरकारचा भर आहे.

याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून आज राज्य सरकार आणि खासगी कंपन्यांमध्ये चर्चा झाली. या बैठकीला लार्सन अँड टुब्रो, रिलायन्स इंडस्ट्रीज, औषध आणि मनोरंजन क्षेत्रातील कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जवळपास २५ कंपन्यांचे प्रमुख अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

यावेळी राज्य सरकारकडून या कंपन्यांसमोर जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची परवानी द्या, असा प्रस्ताव ठेवण्यात आला. अनेक कंपन्यांनी त्यावेळी वर्क फ्रॉम होमच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आपल्या वाहिन्यांवरुन कोरोना व्हायरस विषयी जनजागृती करण्यास मनोरंजन क्षेत्रातील कंपन्या तयार असल्याचे टोपे म्हणाले. त्याचबरोबर या कंपन्यांनी सीएसआर फंडातून मास्क, सॅनिटायझर्स आणि आयसोलेशन वॉर्ड उभारणीसाठी सुद्धा निधी उपलब्ध करुन देण्याची तयारी दर्शवल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.

Leave a Comment