फलाटावरील गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट 10 वरुन 50 रुपये


मुंबई : केंद्र सरकारसोबतच देशभरातील अन्य राज्य प्रशासनाने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शक्य ते सर्व निर्णय घेण्याची तयारी केली आहे. त्याचाच एक म्हणून रेल्वे प्लॅटफॉर्मवर गर्दी होऊ नये यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट 10 रुपयांऐवजी तब्बल 50 रुपये करण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग प्लॅटफॉर्मवरील गर्दीमुळे वाढू शकतो, त्यामुळे तो टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट तब्बल पाच पटीने वाढवण्यात आले आहे.

हा निर्णय मोठमोठ्या रेल्वे स्थानकांसाठी घेतला आहे. कोरोनाचा फैलाव होऊ नये, लोकांनी अधिक एकत्र एका ठिकाणी जमू नये, जेणेकरून कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेवरील मुंबई, पुणे, भुसावळ, नागपूर आणि सोलापूर विभागात प्लॅटफॉर्म तिकीट 10 रुपयांवरुन 50 रुपये एवढे करण्यात आले आहे.

Leave a Comment