दिलासादायक… १८ मार्चपासून सुरु होणार येस बँकेच्या सर्व सेवा


नवी दिल्ली : 18 मार्च संध्याकाळी 6 वाजेपासून येस बँकेच्या ग्राहकांच्या अडचणी दूर होणार आहेत. बँकवर असलेला 3 एप्रिल पर्यंतचा मोराटोरियम 18 मार्चला हटवण्यात येईल, असे अर्थमंत्रालयाने आधीच स्पष्ट केले आहे. आता याला येस बँकने देखील ट्विट करत दुजोरा दिल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. येस बँकेने म्हटले की, बँकेच्या सर्व सेवा 18 मार्चपासून संध्याकाळी 6 वाजेपासून सुरळीतपणे सुरु होणार आहेत.

ग्राहकांना बँकेच्या सर्व सेवा 19 मार्चपासून मिळणार आहेत. ग्राहकांना 50 हजार रुपयापेक्षा अधिकची रक्कम देखील काढता येणार आहे. बँकेने ट्विट करत म्हटले की, ग्राहक आमच्या 1132 शाखांपैकी कोणत्याही शाखेत निराश होणार नाहीत. याशिवाय डिजीटल सेवा आणि प्लॅटफॉर्म्सवर देखील निराश होणार नाही.

Leave a Comment