कोरोनाला अल्लाहचा कहर म्हणणाऱ्या मुस्लिम धर्मगुरूलाच झाली कोरोनाची लागण!


नवी दिल्ली – इराकमधील शिया मुस्लिम धर्मगुरु हादी अल मोदारीस यांनी काही दिवसांपूर्वी कोरोना व्हायरस म्हणजे अल्लाहने चीनला दिलेली शिक्षा असून कोरोना व्हायरस अल्लाहनेच चीनमध्ये पाठवल्याचे वक्तव्य केले होते. पण आता त्यांनाच कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

जगातील 1/7 लोकसंख्या एक पुरातन आणि मोठा देश असणाऱ्या चीनमध्ये राहते. दहा लाखांहून अधिक मुस्लिमांना याच चीनमधील अत्याचारी प्रशासनाने नजरकैदेत ठेवले होते. अल्लाहने याच चीनी लोकांना शिक्षा देण्यासाठी हा विषाणू पाठवल्याचे वक्तव्य मोदारीस यांनी केले होते.

40 लाखांहून अधिक मुस्लिमांना अत्याचारी चीनने नजरकैदेत ठेवले आहे. ते ज्या नकाबची मस्करी करत होते. तेच नकाब (मास्क) घालून त्यांना फिरावे लागत असल्याचे मोदारीस म्हणाले होते. सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता.

Leave a Comment