शाहरुखचा मन्नत देशातील पाच महाग घरात सामील


फोटो सौजन्य कॉकटेल जिंदगी
मुंबईच्या बांद्रा भागात समुद्राला फेसिंग करून असणारा बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान याचा बंगला मन्नत देशातील टॉप टेन महागड्या घरात पाचव्या क्रमांकावर आला आहे. जीक्यू इंडिया मासिकाने शाहरुखच्या या बंगल्याला देशातील सर्वात महाग आणि अलिशान घरांच्या यादीत पाचवे स्थान दिले आहे. शाहरुखच्या मन्नतचे अनेक फोटो सातत्याने प्रसिध्द होत असले तरी या बंगल्याच्या आतील भागांचे फोटो फारसे कधीच पाहायला मिळत नाहीत. शाहरुखची पत्नी गौरी इंटिरीअर डिझायनर आहे. तिनेच हा बंगला सजविला आहे. या शिवाय बॉलीवूड मधील अनेक नामवंत कलाकारांची घरे सजविण्याचे कामही तिने केले आहे.

देशातील सर्वात महाग घरे असलेल्या मालकांच्या यादीत उद्योगपती मोठ्या संखेने आहेत. मात्र पहिल्या पाच महाग घरात स्थान मिळविणारा शाहरुख पहिलाच कलाकार आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर मुकेश अंबानी यांची अँटीलिया आहे तर दुसऱ्या क्रमांकावर आहे गौतम सिंघानिया यांचे जेके हाउस. तीन क्रमांकावर अनिल अंबानी यांचे अडोबी आहे तर चार क्रमांकावर आहे के एम बिर्ला यांचे जातिया हाउस. पाचव्या क्रमांकावर शाहरुखचा मन्नत आहे.

या बंगल्याची प्रसिद्धी शाहरुख मुळेही आहे. येथे दररोज शेकडो लोक मन्नतच्या दारासमोर उभे राहून फोटो काढतात. मन्नत मुंबईत येणाऱ्यांसाठी टुरिस्ट स्पॉट बनला आहे. या बंगल्याची किंमत २०० कोटी असून बंगल्यातून अरबी समुद्राचा सुंदर देखावा दिसतो.

Leave a Comment