टीक-टॉकवर व्हायरल होत आहे हे हटके चॅलेंज

टीक-टॉकवर दररोज कोणते तरी चॅलेंज व्हायरल होत असते. अशाच एका चॅलेंजने सर्वांना भूरळ घातली आहे. यामध्ये अमेरिकेच्या सेनेटर एलिजाबेथ वॉरेन आणि गायिका-अभिनेत्री जेनिफर लोपजचा देखील समावेश आहे.

टीकटॉकवर सध्या ‘फ्लिप टू स्विच’ नावाचे चॅलेंज व्हायरल  होत आहे. या चॅलेंजमध्ये दोनजण रॅपर ड्रेकचे हिट गाणे नॉनस्टॉपवर आरशासमोर डान्स करतात. नाचताना अचानक दोघेजण आपली जागा बदलतात. एवढेच नाही तर दोघांचे कपडे देखील यात बदलले जातात.

सर्वात प्रथम फ्लिप टू स्विच चॅलेंजची सुरूवात बेल्ला आणि डॅलिन लॅमबर्टने यांनी केली. त्यानंतर आतापर्यंत सेलिब्रेटी, नेते आणि सोशल मीडिया इन्फ्लुंसरसह हजारो जणांनी या चॅलेंजमध्ये भाग घेतला आहे.

अमेरिकेतील सेनेटर एलिजाबेथ वॉरेन यांनी देखील कॉमेडियन केट मॅककिन्नोनसह हे चॅलेंज पुर्ण केले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, आतापर्यंत 22 मिलियन पेक्षा अधिक जणांनी हा व्हिडीओ बघितला आहे.

@jloWait for it…😂♥️ @arod13♬ I just flipped the switch – bellalambert

@emrataFLIPPED THE SWITCH ##thefatjewish ##leapday ##flipchallenge ##quickcuts♬ I just flipped the switch – bellalambert

@camilacabellohad to do it @theecalvit♬ I just flipped the switch – bellalambert

जेनिफर लोपेझ, मॉडेल इमिली रतजोस्वकी, गायक कॅमिलो कॅबेल्ला अशा अनेकांचे फ्लिप टू स्विच चॅलेंजची व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Leave a Comment