कोरोना व्हायरस टेस्टिंग सेंटर्सची माहिती देणार गुगलची वेबसाईट

कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत हजारो जणांना आपले प्राण गमवावे लागलू असून, या परिणाम अर्थव्यवस्थेवर होताना देखील पाहायला मिळत आहे. अमेरिकन सरकार यासाठी 50 अब्ज डॉलर खर्च करणार आहे. याशिवाय अमेरिकेचे सरकार गुगलसोबत मिळून एक वेबसाईट देखील तयार करणार आहे. ज्याच्या मदतीने जगभरातील लोक आपल्या जवळील कोरोना व्हायरस टेस्टिंग सेंटर्सची माहिती घेऊ शकतील. याद्वारे युजर्स कोरोना व्हायरसचे लक्षण काय काय आहेत, याची देखील माहिती घेऊ शकतील.

ही वेबसाईट गुगल एक्स लॅबचे डेव्हलपर्स तयार करणार आहेत. ही वेबसाईट रविवारपर्यंत लाँच होण्याची शक्यता आहे.

या वेबसाईटच्या डोमेनबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. मात्र वेबसाईट सुरू झाल्यावर त्याद्वारे युजर्स त्यांच्यात कोरोनाचे काही लक्षण तर नाही, याची माहिती घेऊ शकतील.

Leave a Comment