अनुभव सिन्हांच्या आगामी चित्रपटात आयुष्मान

‘थप्पड’ चित्रपटाचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्या आगामी चित्रपटात अभिनेता आयुष्मान खुराणा झळकणार आहे. या संदर्भातील माहिती बॉलिवूड ट्रेड अ‍ॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटवर दिली आहे.

तरण आदर्श यांच्यानुसार, मुल्क, आर्टिकल 15 आणि थप्पड या चित्रपटानंतर अनुभव सिन्हा एक्शन थ्रिलर चित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटात आयुष्मान खुराणा मुख्य भूमिकेत असेल. चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित झाले नसून, 16 ऑक्टोंबर 2020 ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मात्र अद्याप आयुष्मान खुराणा आणि अनुभव सिन्हा यांनी याबाबत अधिकृत सांगितलेले नाही.

अनुभव सिन्हा आणि आयुष्मान खुराणा हे दोघेही आर्टिकल 15 या चित्रपटानंतर पुन्हा एकत्र येत आहे. आर्टिकल 15 या चित्रपटाचे समीक्षकांनी कौतूक केले होते. या चित्रपटासाठी आयुष्मानला सर्वोत्तम अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला आहे.

याशिवाय अनुभव सिन्हा हे मुल्क, रावन आणि दस या चित्रपटांसाठी ओखळले जातात. काही दिवसांपुर्वीच त्यांनी दिग्दर्शन केलेला व तापसी पन्नूची प्रमूख भूमिका असलेला थप्पड हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

Leave a Comment