व्हायरल : खाण्यासाठी एकमेंकाशी भिडली शेकडो माकडे

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून, यामुळे विचित्र घटना घडत आहेत. या व्हायरसचा परिणाम अर्थव्यवस्था, इंडस्ट्री आणि पर्यावरणावर देखील पाहिला मिळत आहे. याच पार्श्वभुमीवर असंख्य माकडांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, शेकडो माकडे अन्नाच्या एका घासासाठी भांडत करत आहे. हा व्हिडीओ मध्य थायलंडमधील आहे.

डेल मेलद्वारे ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, याला आतापर्यंत 16 मिलियन पेक्षा अधिक वेळा पाहण्यात आले आहेत. एका केळीसाठी ही माकडे भांडत आहेत. थायलंडमध्ये मोठ्या प्रमाणात माकडे आढळतात व या माकडांना पर्यटकांतर्फे केळी देखील खायला घातली जातात. मात्र कोरोना व्हायरसचा फटका थायलंडच्या पर्यटनाला देखील बसला असून, माकडांवर आता याचा परिणाम पाहायला मिळत आहे.

बँकॉक पोस्टनुसार, या माकडांचे दोन गट आहेत. एक मंदिराच्या भागात राहतो तर एक मुख्य शहरात. हे दोन गट ट्रेन ट्रॅकद्वारे विभागलेले आहेत. मात्र अन्नाच्या शोधात हे गट एकमेंकाशी भांडत आहेत.

या व्हिडीओवर शेकडो युजर्सनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Leave a Comment