गायीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मागितली चक्क ट्विटरवर मदत

एखाद्या गुन्हेगाराला शोधण्यासाठी अनेकदा पोलिसांनी सोशल मीडियाचा वापर केल्याचे तुम्ही ऐकले असेल. मात्र कधी प्राणी शोधण्यासाठी पोलिसांनी सोशल मीडियाचा आधार घेतल्याचे ऐकले आहे का ? मात्र हे खरे आहे, पोलिसांनी चक्क हरवलेली गाय शोधण्यासाठी ट्विटरवर मदत मागितली आहे.

अमेरिकेतील दक्षिण फ्लोरिडा येथील एक गायब हरवली आहे. या गायीने पोलिसांना हैराण करून सोडले आहे. मागील एक आठवड्यांपासून पेमब्रोक पायन्स पोलीस विभाग या गायीचा शोध घेत आहे.

पोलिसांनी या संदर्भात आवाहन करणारे ट्विट देखील केले. विभागाने ट्विट केले की, गाय धोकादायक नाही, मात्र तिला रस्त्यावर फिरायला आवडते. कृपया गाडी चालवताना सावधान राहा. गायवर चालताना हिंसा करणे आणि पोलिसांना चकमा देऊन पळून जाण्याचा आरोप आहे.

Leave a Comment