बीएसएनएलने एसबीआयसोबत मिळून लाँच केले ‘भारत इंस्टापे’

बीएसएनएल आणि स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) मिळून डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म भारत इंस्टापे लाँच केले आहे. भारत इंस्टापेद्वारे बीएसएनचे पार्टनर कंपनीच्या ऑफिसला न जाता, पेमेंट करू शकतील. मात्र यासाठी ऑनलाईन व्हेरिफिकेशन करावे लागेल.

बीएसएनएलने भारत इंस्टापेचे पोर्टल लाँच केले आहे. बीएसएनएलच्या भारत इंस्टापे प्लॅटफॉर्मवर पेमेंटसाठी चॅनेल पार्टनर्सला एक खास कोड मिळेल. जो त्यांचा आयडी असेल. या प्लॅटफॉर्मद्वारे पार्टनर्स वेळेवर पेमेंट करू शकतील.  या प्लॅटफॉर्ममुळे ऑफिसला जाण्याचा वेळ वाचेल. यामुळे पार्टनर 24X7 ऑनलाईन पेमेंट करू शकतात.

या पोर्टलच्या लाँचिंगवेळी डायरेक्टर विवेक बंजाल म्हणाले की, कंपनी बिझनेस पार्टनरच्या सुविधेसाठी सतत काम करत आहे.

Leave a Comment