माउंट एव्हरेस्टवर झाले ट्रॅफिक जॅम

माउंट एव्हरेस्ट शिखर सर करण्याचे स्वप्न प्रत्येक गिर्यारोहकांचे असते. जगातील सर्वाक उंच शिखर सर करण्यासाठी लोकांची गर्दी होताना दिसत आहे. शिखर सर करण्यासाठी एव्हरेस्टवर गिर्यारोहकांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. यामुळे 8,848 मीटर उंचीवर ट्रॅफिक जॅम होऊ लागले आहे.

आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांनी माउंट एव्हरेस्टवरील रात्राची एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये गिर्यारोहक टॉर्चच्या मदतीने गिर्यारोहक वरती चढताना दिसत आहेत. एव्हरेस्ट चढणाऱ्या गिर्यारोहकांची संख्या जास्त झाल्याने लोक ठिकठिकाणी बसलेले दिसत आहेत.

Leave a Comment