जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना घोषित केले ‘महामारी’


नवी दिल्ली – चीनपासून सुरुवात झालेल्या कोरोनाने जगभरातील अनेक देशांना आपल्या विळख्यात घेतले आहे. आत्तापर्यंत जगभरातील 107 पेक्षा अधिक देशातील एक लाखापेक्षा अधिक लोकांना या व्हायरसची लागण झाल्याचे समोर आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) या पार्श्वभूमीवर कोरोना व्हायरस हा महामारी (साथीचा रोग) असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तसेच, भारतातील केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आत्तापर्यंत 4 हजारापेक्षा अधिक लोकांचा चीनच्या वुहान राज्यातून जगभर पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे बळी घेतला आहे. चीन, इटली, इरान, दक्षिण कोरिया, स्पेन, फ्रान्स, अमेरिका, जपान, इराक, इंग्लंड, नेदरलँड, ऑस्ट्रेलिया, लेबनॉन, स्वित्झर्लँड, मरीनो, जर्मनी, बेल्जीयम, इंडोनेशिया, पनामा, मोराक्को, कॅनडा, फिलीपाईन्स, इजिप्त, अर्जेंटीना, थायलँड आणि तैवान यांसारख्या देशातील नागरिकांचा यामध्ये समावेश आहे.

Leave a Comment