सुपरस्टार रजनीकांत यांनी केली स्वतःच्या पक्षाची घोषणा


चेन्नई – आपल्या स्वतंत्र राजकीय पक्षाची दक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी घोषणा केली. याबाबतची घोषणा त्यांनी चेन्नईतील लीला पॅलेस या हॉटेलमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. रजनीकांत यांनी हा निर्णय तामिळनाडूतील अस्थिर राजकीय परिस्थिती पाहून घेतल्याचे सांगितले.

राज्यातील राजकीय वातावरणात 2016 पासून स्थिरता नाही. राजकीय पक्ष निवडणुकांआधी जी आश्वासने आणि चेहरे घेऊन सत्तेत येतात ती पूर्ण केली जात नाहीत. तरुण, सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी, सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांना माझ्या पक्षात प्राधान्य दिले जाईल. 60 ते 65 टक्के संधी तरुणांनी देण्यात येणार असल्याची माहिती रजनीकांत यांनी दिली.

केवळ पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी काम पाहणार आहे. मला मुख्यमंत्री पदाची अपेक्षा नाही. मला 1996 मध्येही दोनदा मुख्यमंत्रीपदासाठी विचारण्यात आले होते, तेव्हाही मी नाकार दिल्याचेही रजनीकांत यांनी सांगितले.

Leave a Comment