सोशल मीडियाद्वारे कोरोनाग्रस्तांची नावे उघड करणाऱ्यांवर होणार कारवाई


पुणे – सोशल मिडियाच्या माध्यमातून कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची नावे उघड करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिला आहे.

सर्वांनी अशा परिस्थितीत दक्षता घेणे आवश्यक असून प्रशासनाला आपत्तीच्याप्रसंगी सहकार्य करण्याची सर्वांचीच जबाबदारी असते. नावे उघड झाल्यास विनाकारण त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना त्रास होऊ शकतो. तेव्हा नागरिकांनी सामाजिक भान ठेवणे आवश्यक आहे. कोणीही नावे उघड करता कामा नये, असे आवाहन आम्ही पहिल्या दिवसांपासून करीत आहोत.

पण कोणीतरी सोशल मिडियाच्या माध्यमातून चुकीची माहिती प्रसारित करून समाजामध्ये संभ्रम निर्माण करीत असल्याची तक्रार आमच्याकडे प्राप्त झाली आहे. पोलिस विभागाचा सायबर सेल या अनुषंगाने लक्ष ठेऊन आहे. अफवा पसरवित असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असे डॉ.म्हैसेकर यांनी सांगितले.

Leave a Comment