हजारो प्लास्टिक तुकड्यांपासून बनविण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांची पोट्रेट

एनिमेशन आर्टिस्टने छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार जयंतीच्या निमित्ताने त्यांचे मोजेक पोर्टेट बनवून जागतिक विक्रम केला आहे. हे पोर्टेट नितीन दिनेश कांबळे या कलाकारने तयार केले आहे. नितीननुसार त्याने 10 दिवसात 10 फूट लांब आणि 8 फूट रुंद चित्र तयार केले आहे. हे चित्र तयार करण्यासाठी त्याने सहा विविध रंगाच्या 46 हजार प्लास्टिक तुकड्यांचा वापर केला.

नितीन कांबळेनी सांगितले की, हे पोर्टेट बनविण्यासाठी 46,080 प्लास्टिकच्या तुकड्यांचा वापर केला आहे. भारतात सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी आहे. मात्र आपण याची प्रभावीपणे अंमलबजावणी करू शकलेलो नाही. कारण प्लास्टिक आधीपासूनच बाजारात उपलब्ध आहे. पर्यावरणाप्रती जागृक करण्यासाठीच हे पोर्टेट बनविल्याचे त्याने सांगितले.

त्याने सांगितले की, हा विक्रम वर्ल्ड रिकॉर्ड्स इंडियामध्ये नोंदविण्यात आले. हा माझा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. मला स्वातंत्र्य सैनिकांसाठी पुढे काम करायचे आहे. युवा पिढींने त्यांच्याबद्दल जाणून घ्यावे व त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी.

Leave a Comment