एबी डीवीलीअर्सने सद्गुरुना विचारला लकी लॉटरी नंबर


फोटो सौजन्य माय खेल
द. आफ्रिकेचा दणकेबाज क्रिकेटर एबी डीवीलीअर्स याने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला असून त्यात सद्गुरू म्हणजे जग्गी वासुदेव याना एक प्रश्न विचारला आहे. यात एबी म्हणतो, ‘सद्गुरू, पुढच्या आठवड्यात लॉटरी मध्ये कोणता नंबर निवडू म्हणजे मी लॉटरी जिंकू शकेन?’ यावर सद्गुरुंनी त्याला मोठे मार्मिक उत्तर दिले आहे. सद्गुरू म्हणतात, लोटो लॉटरीसाठी लकी नंबर मी देऊ शकतो पण तू मैदानातच चौके छक्के लाव म्हणजे तुला लॉटरी आपोआप लागेल असे माझे म्हणणे आहे.

सद्गुरू पुढे म्हणतात, भारतात तुला खूप प्रेम मिळते आहे. एप्रिलमध्ये ते द. आफ्रिकेत जाण्यास उत्सुक आहेत. एबी पुढे विचारतो, ‘ द, आफ्रिकेचा इतिहास दुःखदायक आहे तो विसरून पुढे कसे जाता येईल?’ यावर सद्गुरू म्हणतात, इतिहास बदलायचा नसतो तर भविष्याचा विचार करायचा असतो. आज इतिहास अस्तित्वात नाही त्यामुळे त्यात अडकून राहायचे नाही आणि तो दुरुस्त करण्याचा प्रयत्नही करायचा नाही. पण भविष्याचा विचार करायचा.

मिस्टर ३६० नावाने क्रिकेट जगतात प्रसिद्ध असलेला एबी सध्या मैदानाबाहेर आहे. मात्र टी२० वर्ल्ड कप मध्ये तो द. आफ्रिका टीमचा सदस्य असेल असा अंदाज वर्तविला जात आहे.

Leave a Comment