किडनी दिन : वेळेवर तपासणी न केल्यास उद्भवू शकते किडनीची समस्या

दरवर्षी मार्च महिन्यातील दुसरा गुरूवार जागतिक किडनी दिन म्हणून पाळला जातो. या निमित्ताने लोकांना किडनीच्या आजाराविषयी जागृक करण्याचा प्रयत्न केला जातो. लोकांमध्ये जागृकता नसल्याने लोक किडनीसारख्या महत्त्वपुर्ण अवयवाकडे दुर्लक्ष करत असतात. जर एखादी व्यक्ती वेळोवेळी तपासणी करत असेल, तर किडनीला काहीही होणार नाही.

देशात किडनीची समस्या असणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत आहे. किडनी प्रत्यारोपण केल्यानंतर देखील अनेक रुग्णांना त्रास जाणवतो. काही असे रुग्ण देखील आहेत, ज्यांना प्रत्यारोपणानंतर सीएनव्ही आणि बीके व्हायरस ग्रासतो.

किडनी शरीरातील महत्त्वाचा अवयव आहे. याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. मात्र बदलत्या जीवनशैलीमुळे किडनीला नुकसान पोहचत आहे. ज्या कुटुंबामध्ये किडनीचा समस्या आहे, त्या घरातील 35 किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या लोकांना दरवर्षी तपासणी करायला हवी.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, सध्या जगात किडनीची समस्या असलेले 85 कोटी लोक आहेत. जर वेळेनुसार जीवनशैलीत बदल केला नाहीतर 2040 पर्यंत किडनीची समस्या आकस्मिक मृत्यूचे पाचवे सर्वात मोठे कारण ठरेल.

या वर्षी किडनी दिनाची थीम ‘हेल्थ फॉर एव्हरी वन एव्हेरीवेअर फ्रॉम प्रिव्हेंशन टू डिटेंशन अँड एक्यूटेबल एक्सेस टू केअर’ अशी आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment