खूप नाही, थोडीशी, स्मृती इराणी यांची होली


फोटो सौजन्य इंडिया टुडे
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी त्यांच्या घरी साजऱ्या झालेल्या घरगुती होळीचा पती आणि मुलीसमवेतचा एक छान फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. आणि खूप नाही पण थोडीशी होली असे लिहून त्यांच्या चाहत्यांना होलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोत स्मृती पती झुबिन आणि कन्या जोईश याच्यासोबत आहेत. त्याच्या सर्वाच्या अंगावर गुलाल दिसतो आहे.

यंदा जगभरात फैलाव झालेला करोना भारतातही आल्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी होली मिलन कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यावेळी मोदी यांनी केलेल्या ट्विट मध्ये जगभरातील तज्ञ कोविद १९ चा फैलाव रोखण्यासाठी जादा लोकांनी एकत्र जमू नये असा इशारा देत आहेत त्यामुळे होली मिलन कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले होते. त्यामुळेच कदाचित स्मृती इराणी यांनीही सार्वजनिक होळीत सामील न होता पंतप्रधानांच्या विनंतीला मान देऊन घरापुरती होली साजरी केली आहे.

Leave a Comment