कोरोनाच्या भीतीमुळे रद्द होणार टोकियो ऑलिम्पिक ?


टोकियो : चीनसह जगभरात कोरोना व्हायरसचा धोका वाढला असून चीनमध्ये या व्हायरसमुळे मृत पावलेल्यांचा आकडा ४०००च्या घरात गेला आहे. त्याचबरोबर कोरोनाबाधीत अनेकांचा इराण, इटली येथेही मृत्यू झाला. येथील संख्याही ५००च्यावर गेली आहे. टोकियो ऑलिम्पिक २०२० या कोरोनाच्या भीतीमुळे पुढे ढकलण्याची शक्यता असल्याची माहिती टोकियोचे प्रमुख ताकाहाशी यांनी दिली आहे. कोरोनाचे सावट उन्हाळ्यापर्यंत कमी न झाल्यास ऑलिम्पिकचे निर्धारित वेळापत्रक स्थगित केले जाईल.

अद्याप अनेक महिने टोकियोची २०२० ऑलिम्पिक सुरू होण्यास आहेत. जुलै २०२० ला ही स्पर्धा सुरु होणार आहे. तरीही नियोजित कार्यक्रमावर संकट उभे राहिले आहे. कोरोना व्हायरसचा जगात वाढता प्रसार आणि कोरोना बाधित लोकांचा मृत्यू यामुळे टोकिओ ऑलिम्पिक घ्यायची का, की घेऊ नये, याचीच चर्चा सुरु झाली आहे. लोक कोरोना आजाराच्या वाढत्या परिणामांमुळे ही स्पर्धा पुढे जाऊ शकतात?

दरम्यान, टोकियोमध्येच २०२० ऑलिम्पिक स्पर्धा होतील असेही सांगण्यात येत आहे. कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव लक्षात घेता जपानने याआधी २०२० उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करण्याचा किंवा पुढे ढकलण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीबरोबरच्या टोकियो येथे पार पडलेल्या बैठकीत टोकियो ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक आयोजन समितीचे प्रमुख योशिरो मोरी यांनी ही माहिती दिली.

Leave a Comment