प्रयागराजमध्ये सुरु झाले देशातील पहिले मोबाईल व्यसनमुक्ती केंद्र


अलीकडे खाता पिता प्रत्येकाच्या हाताला मोबाईल हे हाताच्या पकडीत मावणारे पण जगाची माहिती ठेवणारे उपकरण जणू काही चिकटूनच राहिलेले असते, या मोबाईलसाठी काही जण तर इतके वेडे असतात की त्यांना फोन क्षणभरही डोळ्यासमोरून दूर झालेला चालत नाही, त्याचबराबर कोणी त्यांच्या फोनसोबत मस्ती केली तर ही मंडळी अक्षरशः हिंसा करायलाही मागेपुढे पाहत नसल्यामुळे अशा लोकांना एकाअर्थी या फोनचे व्यसनच लागले आहे असे म्हटल्यास वावगे ठरु नये. आजवर फोनमुळे झालेल्या हिंसक घटना लक्षात घेता प्रयागराजमधील मोतीलाल नेहरू विभागीय रुग्णालयात मोबाइल व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. व्यक्तीचे मोबाईल आणि इंटरनेटचे वेड कमी करण्यासाठी या केंद्रात उपचार केले जाणार आहेत. विशेष म्हणजे, पहिल्याच दिवशी रुग्णालयात 15 रुग्ण उपचारासाठी दाखल झाल्याचे सुद्धा समजत आहे.

याबाबत रुग्णालयातील डॉ. राकेश पासवान यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर खूप दिवसांपासून डॉक्टरांची टीम काम करत होती. त्यानंतर हे केंद्र सुरू करण्यात आले. औषधासोबतच समुपदेशन पहिल्याच दिवशी आलेल्या रुग्णांना करण्यात आले. विद्यार्थ्यांची संख्या ही रुग्णांमध्ये जास्त आहे. केंद्रांमध्ये मुलांना लागलेले फोनचे आणि इंटरनेटचे व्यसन सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. तर मानसोपचारतज्ञ ईशान्य राज यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाईलच्या अतिवापराने मानसिक आणि शारिरीक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होतो, हे रोखण्यासाठी मोबाइल व्यसनमुक्ती केंद्रामध्ये सध्या सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी उपचार केले जातात. तर आठवड्यातील इतर दिवशी डॉक्टरांची टीम विभागात जाऊन मोबाइलच्या व्यसनाची लोकांना माहिती देऊन त्यापासून सावध करत आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment