‘रॉ’चे गुप्तचर कसे बनाल ? जाणून घ्या संपुर्ण माहिती


जर तुम्हाला देशासाठी काहीतरी करायचे असेल, देशसेवा करायची असेल तर तुम्ही भारतीय सुरक्षा एजेंसी रॉमध्ये करिअर करू शकता. प्रसिध्दी मिळवण्यासाठी काम करणाऱ्या तरूणांची या फिल्डमध्ये गरज नाही. कारण या ठिकाणी स्वतःची ओळख लपवून काम करण्याची गरज असते. याचबरोबर या फिल्डमध्ये स्वतःच्या कामाबद्दलची माहिती देखील लपवावी लागते. हे एक प्रकारे जासूसीचे कार्य आहे. रॉचा फुलफॉर्म रिसर्च अॅन्ड एनालायसिस विंग आहे. रॉ विभागात भरती होण्यासाठी कोणतीही डायरेक्ट भर्ती परिक्षा नसते.

सर्वात आधी तुम्हाला भारतीय सुरक्षा क्षेत्र अथवा भारतीय सिव्हिल सेवा विभागात सामील व्हावे लागेल.  या विभागामध्ये योग्य अनुभव प्राप्त केल्यानंतर तुम्हाला एक इंटरव्यू द्यावा लागेल. या इंटरव्यूमध्ये पास झाल्यानंतर तुम्ही रॉ विभागासाठी पात्र समजले जाता.

रॉ अधिकाऱ्यांना भारतात अथवा विदेशात काम करण्यासाठी एक गुप्त एजेंट म्हणून नियुक्त करत असते. यामध्ये जे राष्ट्रीय स्तरावरील सेवेमध्ये आहेत तसेच सुरक्षा विभात मुख्यता आयपीएस अधिकारी, केंद्रीय अधिकारी, सीआयडी आधिकारी, आयएमए, आयएनए, एएफएमध्ये कार्यरत असणारे अधिकारी असतात. रॉ विभाग साधारणपणे सिव्हिल सेवा अथवा पोलिस विभागांमधून उमेदवारांची निवड करतात. सध्या रॉ विभाग थेट पदवीधर उमेदवारांची निवड करत आहे. जर तुम्हाला पदवीनंतर रॉमध्ये सहभागी व्हायचे असेल तर तुमच्याकडे खास गुण असणे आवश्यक आहेत. जसे की, कंम्प्युटर हँकिंग, विशेष कार्य कौशल्य, इंटरनेटमध्ये गती या गोष्टी येणे आवश्यक आहेत.

अशा पदवीधरांना रॉमध्ये सहज जागा मिळते. भारतीय रॉ विभागामध्ये सामिल झाल्यानंतर उमेदवार आतंकवाद सारख्या परिस्थितीत कार्य करतात. तसेच कोणत्याही सिक्रेट मिशनमध्ये काम करावे लागते. रॉ विभागात पगाराची काळजी नाही. येथे पगार जास्त देण्यात येतो.

योग्यता –

  • वय – 19 ते 25 च्या मध्ये असणे गरजेचे
  • शैक्षणिक योग्यता – मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे गरजेचे
  • वैवाहिक स्थिती – उमेदवार अविवाहित हवा
  • नागरिकत्व –  उमेदवार भारतीय हवा

निवड प्रक्रिया –

  • लेखी परिक्षा
  • मुलाकत
  • मेडिकल

रॉमध्ये केवळ गुप्तचर म्हणून काम करण्याबरोबरच अन्य भूमिका देखील असतात. अनुवादक, विश्लेषक आणि आयटी क्षेत्रात काम करणे हे काही कमी ग्लॅमरस नाही.

काही निकष –

  • कोणत्याही प्रकारचा गुन्हा तुमच्या नावावर असेल तर तुमचा अर्ज रद्द होण्याची शक्यता आहे.
  • उमेदवाराला ड्रग्ज तपासणी केली जाईल. ड्ग्ज सारख्या पदार्थांचे सेवन स्विकारले जात नाही.
  • अनेक अधिकाऱ्यांना परदेश दौरे देखील करावे लागतात. यात्रा सोडून देखील अनेक भूमिका असतात, मात्र याने तुमचे दुसऱ्या शक्यता कमी होतात.
  • तुम्हाला भारतीय असणे आवश्यक आहे व याबाबत तुमच्या परिवाराने देखील समजून घेणे आवश्यक आहे.

हे काही निकष झाले. मात्र रॉमध्ये सामिल होण्यासाठी खुप प्रतिस्पर्धा आहे. त्यामुळे तुम्हाला दुसऱ्यांपेक्षा काहीतरी वेगळे करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी काही सुचना –

  • कोणतीही एक परदेशी भाषा शिका. खासकरून तुमच्या शत्रू राष्ट्रांची भाषा शिका.
  • खेळ खेळा व फिट रहा. फिट राहणे फायदेशीर ठरू शकते.
  • तुमच्या मित्रांना अर्जाबद्दल सांगू नका. जर तुम्ही तुमच्या मित्रांपासून ही गोष्ट लपवू शकत नाही. तर तुम्ही हे करू शकत नाही.
  • तुम्ही खूप वेळ काम करू शकता ते दाखवून द्या. रॉमध्ये काम करणे म्हणजे 9 ते 5 काम करण्यासारखे नसते.
  • तुमच्यातील लीडरशीप क्वॉलिटी दाखवा.

कोणतीही गोष्ट लपवू नका. तुम्ही कधी ड्ग्सबरोबर पकडले गेला असाल    अथवा कोणती शिक्षा झाली असेल. या सर्वांबद्दल माहिती द्या. कारण ते सर्व गोष्टींचा तपास लावू शकतात. माहिती लपवल्याने तुम्ही अविश्वसनीय वाटता.

अर्ज कसा कराल ?

रॉची वेबसाईट नाही. त्यामुळे अर्ज करणे अवघड आहे. मात्र उप क्षेत्रअधिकारी, कॅबिनेट सचिवालय, भारत सरकराद्वार जाहीर करण्यात आलेल्या नौकऱ्या रॉसाठी मागवण्यात आल्याचे समजले जाऊ शकते. नॅशनल अक़डमी आणि अडमिनिस्ट्रेशनद्वारे प्रवेश संभव आहे.

काही कागदपत्रं आणि तुमची भूमिका  –

  • कुटूंबाची माहिती
  • मानसिक स्वास्थ्य
  • आर्थिक माहिती
  • राजकीय दृष्टीकोण
  • विदेशात केलेला प्रवास

तुमच्याद्वारे देण्यात येणारी कागदपत्रांची पुन्हा तपासणी केली जाईल. त्यामुळे तुम्हाला त्याचे प्रमाण दाखवावे लागले.

  • ओळखपत्र
  • लग्नासंबंधी माहिती
  • रोजगार, शिक्षणासंबंधी कागदपत्र
  • बँकेतील खात्यासंबंधी माहिती

Leave a Comment