महिला दिनानिमित्त पुरूषांनो बघा हे चित्रपट

सिनेमाला समाजाचा आरसा म्हटले जाते. मागील काही काळात हिंदीसह विविध भारतीय भाषेत सामाजिक विषयांवर भाष्य करणारे अनेक चित्रपट आले आहेत. 8 मार्चला दरवर्षी साजरा करण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने अशाच काही चित्रपटांविषयी जाणून घेऊया, ज्यात महिलांच्या दृष्टीकोनातून एक समाज पाहायला मिळतो. महिला दिनाच्या निमित्ताने पुरूषांनी हे चित्रपट पाहायलाच हवेत.

पिंक –

वर्ष 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात तापसी पन्नू आणि अमिताभ बच्चन यांची प्रमूख भूमिका आहे. या चित्रपटात तुम्हाला कोर्टरूम ड्रामा पाहायला मिळेल. या चित्रपटात तुम्हाला एका महिलेला समाज तिचे कपडे आणि राहणीमानावरून कसे जज करतो व ते किती चुकीचे आहे हे पाहायला मिळेल.

थप्पड –

तापसी पन्नूचीच प्रमूख भूमिका असलेला हा चित्रपट काही दिवसांपुर्वीच प्रदर्शित झालेला आहे. कौटुंबिक हिंसाचारावर भाष्य करणारा हा चित्रपट एकदा बघायलचा हवा.

पार्च्ड –

2016 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट चांगलाच चर्चेत राहिला होता. या चित्रपटात मॅरिटल रेप, चाइल्ड मॅरिज, हुंडा प्रथा आणि कौटुंबिक हिंसा अशा अनेक गोष्टींवर भाष्य करण्यात आलेले आहे. यात राधिका आपटे, तनिषा चटर्जी, सुरवीन चावला आणि लहर खान यांची प्रमूख भूमिका आहे.

लिपस्टिक अंडर माय बुरखा –

2016 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात कोंकणा सेन शर्मा, अहाना कुमरा, रत्ना पाठक, प्लबिता आणि विक्रांत मेंस्सी यांची प्रमूख भूमिका आहे. या चित्रपटात समाजाच्या जुन्या रूढीवादी नियमांमध्ये अडकलेल्या महिलांबाबत सांगण्यात आले आहे.

Leave a Comment