सौदी अरेबियात महिलांशी फ्लार्ट केल्यास होईल थेट तुरुंगात रवानगी


आता अरब देशातील पुरुषांना महिलांच्या सौंदर्याचे कौतूक तारिफ करणे किंवा त्यांना कॉफी-डिनरसाठी विचारल्यास महागात पडणार आहे. तेथील महिलांसोबत फ्लर्ट किंवा त्यांचे कौतूक केल्यास तुमची रवानगी थेट तुरुंगात केली जाऊ शकते. यासंदर्भात खलीज टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, जर एखादा कर्मचारी किंवा अधिकारी कंपनीतील महिलेचे गरजेपेक्षा जास्त कौतूक करत असेल किंवा तिला डिनरसाठी विचारल्यास ते महागात पडू शकते. अरब देशातील नव्या कायद्यानुसार, फ्लर्ट करणे अपराध असल्याने तुरुंगाची शिक्षा भोगावी लागणार आहे.

वृत्तानुसार, महिलांचा उपहास किंवा त्यांच्या प्रती त्यांच्या सन्माला नुकसान पोहचवण्याचा प्रयत्न करणे हे अरब संस्कृतिच्या विरोधात आहे. महिलांना अपमानजनक शब्द बोलणे किंवा व्यावहारिक पद्धतीने दुखावल्यास 1987 मध्ये केंद्रीय कायद्यानुसार ते गुन्ह्यात मोडते. त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणत्याही महिलेला अपमानकारक मेसेज किंवा पोस्ट करणे तुम्हाला धोक्यात पाडू शकते. अरब पीनल कोड 359 अंतर्गत आरोपी व्यक्तिला एका वर्षासाठी तुरुंगवास किंवा 10 हजार दिरहामचा दंड देणे अनिवार्य असणार आहे. तसेच महिलांसोबत गैरवर्तवणूक करणारा विदेशी नागरिक असल्यास त्याची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्याची देशातून हकालपट्टी देखील केली जाणार आहे.

दरम्यान, महिलांचा सन्मान लक्षात घेता जगभरातील सर्व देशात कठोर कायदे आहेत. आजच्या काळात या नियमात थोडेफार बदल करण्यात आले आहेत. सौदी अरेबियात महिलांना ड्राइव्ह करणे, खेळात भाग घेणे किंवा नोकरी करण्याची सुद्धा परवानगी नाही आहे. आशातच आता नव्या कायद्यांमुळे पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.

Leave a Comment