चीनमधून सुरू झालेल्या कोरोना व्हायरसच्या विळाख्यात संपुर्ण जग अडकले आहे. भारतात देखील 30 पेक्षा अधिक जणांना याची लागण झाली आहे. या व्हायरसपासून बचावासाठी अनेक उपाय सुचवले जात आहेत. यामुळे अनेक अफवा पसरवण्यात येत आहे. दारूच्या सेवनामुळे कोरोना व्हायरसपासून बचाव होतो, अशी अफवा देखील सोशल मीडियावर पसरवली जात आहे. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) खुलासा केला आहे.
दारूमुळे कोरोना व्हायरसपासून होतो बचाव ? जाणून घ्या सत्य
डब्ल्यूएचओने ही माहिती चुकीचे असल्याचे सांगितले आहे. डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस एडेनॉम घेब्रीसस यांनी सांगितले की, दारूच्या सेवनामुळे कोरोना व्हायरसपासून बचाव होतो, ही माहिती खोटी आहे.
डब्ल्यूएचओनुसार, शरीरात व्हायरस गेल्यास क्लोरिन अथवा दारूमुळे कोणताही व्हायरस मरत माही. कपडे, डोळे आणि चेहऱ्यांवर दारू शिंपडने आरोग्यासाठी धोकादायक आहे.
डब्ल्यूएचओकडून सांगण्यात आले आहे की, कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी अल्कोहल असलेल्या हँडवॉशने वारंवार हात धुवावेत.