8 दिवसात हे काम न केल्यास बंद होतील क्रेडिट-डेबिट कार्डवरील या सेवा

जर तुम्ही तुमच्या डेबिट-क्रेडिट कार्डचा वापर एकदाही ऑनलाईन अथवा कॉन्टॅक्टलेस व्यवहारासाठी केला नसेल, तर 16 मार्च 2020 च्या आधी एकदातरी व्यवहावर करणे अनिवार्य आहे. अन्यथा तुमच्या कार्डवरील ही सेवा बंद होईल. डेबिट-क्रेडिट कार्डवरील अन्य सेवा मात्र सुरू राहतील.

ही सुविधा सुरू ठेवण्यासाठी 16 मार्चच्या आधी तुम्हाला एकदातरी ऑनलाईन अथवा कॉन्टॅक्टलेस ट्रांजक्शन करावे लागणार आहे. या संदर्भात 16 मार्चपासून नवीन नियम लागू होतील.

डेबिट-क्रेडिट कार्डवरील व्यवहाराची सुरक्षा वाढवण्यासाठी आरबीआयने 15 जानेवारीला सूचनापत्र जारी केले होते. यात ऑनलाईन व्यवहारासाठी कधीच उपयोग न करण्यात आलेल्या कार्डांवरील सेवा बंद करण्यास सांगण्यात आले होते.

आरबीआयने सांगितले आहे की, कार्ड देताना देशातील एटीएम आणि पीओएस टर्मिनल्सवर केवळ डोमेस्टिक कार्ड्सद्वारेच व्यवहाराची परवानगी द्यावी. ज्या लोकांना परदेश जाणे होत नाहीत, अशांना ओव्हरसीज सुविधा देण्यात येऊ नये. बँकेत अर्ज करूनच ही सेवा सुरू करू शकता.

याशिवाय सध्या ज्या ग्राहकांकडे डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल कार्ड आहे ते ट्रांजक्शन डिसेबल करायचे की नाही हे स्वतः ठरवू शकतात. ग्राहक कधीही, कोणत्याहीवेळी चालू अथवा बंद करू शकतात व ट्रांजक्शन लिमिटमध्ये देखील बदल करू शकतात.

Leave a Comment