कोरोनामुळे न्हावी असे कापत आहेत केस

कोरोना व्हायरसमुळे सध्या चीनमध्ये भितीचे वातावरण आहे, चीनमधील रस्ते ओस पडले आहेत. लोक एकमेंकापासून अंतर ठेवत आहेत. अशातच कोरोना व्हायरसची भिती दर्शवणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक न्हावी केस कापत आहेत. मात्र न्हावी ज्या पद्धतीने केस कापत आहे, ते पाहून तुम्ही देखील हैराण व्हाल.

https://www.facebook.com/ItsGoneViralOfficial/videos/808558812972257/?t=60

हा व्हिडीओ सिचुआन येथील असून, यात 30 वर्षीय ही बिंग दिसत आहे. बिंगने सांगितले की, या हेअरकटला लाँग डिस्टेंस हेअरकटल म्हटले जात आहे. यात उपकरणांचा वापर अंतर ठेऊन केस कापण्यासाठी केला जात आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की सर्वांनी मास्क घातले आहेत. सॅलूनच्या मालकाने सांगितले की, ग्राहकांना सुरक्षित वाटावे यासाठी ते असे करत आहेत.

Leave a Comment