बॉलिवूड अभिनेत्री या आपल्या स्टायलिश कपडे, पर्स, बुट यासाठी ओळखल्या जातात. मात्र बॉलिवूडमधील लग्न झालेल्या अभिनेत्रींचे मंगळसूत्र देखील कितीतरी लाखांचे असते. दीपिका पादुकोण पासून ते ऐश्वर्या रायपर्यंत अनेक विवाहित बॉलिवूड अभिनेत्रींकडे एवढे महागडे मंगळसूत्र आहेत, ज्याचा तुम्ही कधी विचारच केला नसेल.
या अभिनेत्रींकडे आहे सर्वात महाग मंगळसूत्र
दीपिका पादुकोण –
दीपिका आणि रणवीर सिंहने 2018 ला इटलीमध्ये लग्न केले होते. दीपिकाच्या मंगळसुत्राबद्दल यावेळी रिपोर्ट समोर आला होता. यानुसार, काळे आणि सोन्याचे मोती व सिंगल डायमंड वाल्या मंगळसुत्राची किंमत 20 लाख रुपये सांगितली जात आहे.
अनुष्का शर्मा –
अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने देखील इटलीमध्ये लग्न केले होते. अनुष्काच्या मंगळसुत्राबद्दल सांगायचे तर यात स्लीक मात्र मोठे पेडेंट होते. जे डायमंड स्टड होते. रिपोर्टनुसार, अनुष्काच्या या मंगळसुत्राची किंमत 52 लाख रुपये आहे.
ऐश्वर्या राय बच्चन –
ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चने लग्न देखील विशेष गाजले होते. लग्नात ऐश्वर्याने 75 लाखांची कांझीवर्म पिवळी साडी घातली होती. सांगण्यात येते की, बच्चन कुटुंबाने सुनेसाठी थ्री डायमंड पीस असणारे 45 लाखांचे मंगळसुत्र निवडले होते.
शिल्पा शेट्टी –
शिल्पाला लग्नात राज कुंद्राने जी अंगठी दिली होती, त्याची किंमत 3 कोटी रुपये सांगितले जाते. तर राजने शिल्पाला जे डायमंड स्टडिड मंगळसूत्र घातले होते, त्याची किंमत 30 लाख रुपये होती.
काजोल –
काजोल आणि अजय देवगनच्या लग्नाने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. महाराष्ट्रीयन पद्धतीने झालेल्या या लग्नात अजयने काजोलला 21 लाख रुपयांचे मंगळसूत्र घातले होते.
करिश्मा कपूर –
करिश्मा कपूरच्या लग्नाची जोरदार चर्चा झाली होती. करिश्माच्या डायमंड स्टडिड मंगळसुत्राची किंमत 17 लाख रुपये असल्याचे सांगितले जाते.
माधुरी दीक्षित –
माधुरीने श्रीराम नेनेशी लग्न करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. नेने यांनी माधुरीला 8 लाख रुपयांचे मंगळसूत्र घातले होते.
सोनम कपूर –
सोनम कपूरने आपल्या लग्नातील सर्व ड्रेस, ज्वलेरी स्वतः डिझाईन केले होते. तिच्या मंगळसुत्रात तिचे व पती आनंद आहुजाच्या राशीचे चिन्ह होते व मध्यभागी एक सिंगल डायमंड पीस होता. रिपोर्टनुसार, या मंगळसुत्राची किंमत केवळ 50 हजार रुपये आहे.