103 वर्षांचा वर, 37 वर्षांची वधू, हुंड्याची रक्कम वाचून व्हाल थक्क

इंडोनेशियामध्ये 103 वर्षीय वृद्धाचे आपल्या पेक्षा वयाने 66 वर्षीय महिलेशी केलेले लग्न सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. 103 वर्षीय पुआंग कट्टेने 37 वर्षीय इंडो अलंगसोबत लग्न केले आहे. सोशल मीडियावर या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत.

पुआंग एक डच कर्नल आहेत. त्यांनी 1945 ते 1949 मध्ये युद्धात भाग घेतला होता. वृद्धाशी लग्न करणाऱ्या महिलेच्या एका नातेवाईकाने सांगितले की, त्यांना पुआंग यांचे खरे वय माहित नाही. मात्र नक्कीच त्यांचे वय 100 पेक्षा अधिक आहे.

पुआंगने मुली कडच्यांना जो हुंडा दिलेला त्याची देखील विशेष चर्चा आहे. पुआंगने मुलीकडच्यांना हुंड्यात जवळपास 25 हजार रुपये आणि 1 सोन्याची अंगठी देऊन लग्न केले आहे.

लग्नानंतर हे जोडपे साउथ सुलावेसी येथे सोबत राहत आहे. याआधी देखील वयामध्ये प्रचंड अंतर असलेले विवाहाची अनेक प्रकरण समोर आलेली आहेत.

Leave a Comment