आता चक्क आयफोनमध्ये वापरा अँड्राईड

टेक कंपनी अ‍ॅपलचा आयफोन आपल्या आयओएस सिस्टमसाठी ओळखला जातो. आयफोनमध्ये आयओएसच्या जागी अँड्राईड ऑपरेटिंग सिस्टम वापरता येईल का ? असा प्रश्न विचारल्यास, तुमचे उत्तर नक्कीच नाही असे असेल. मात्र हे शक्य आहे. तुम्ही देखील आपल्या आयफोनवर अँड्राईड वापरू शकता.

डेव्हिड वांग नावाच्या व्यक्तीने आयफोन 3जीमध्ये गुगलचे ऑपरेटिंग सिस्टम यशस्वीरित्या वापरले होते. आता त्याच वांगच्या सायबर सिक्युरिटी स्टार्टअप कोरेलियम आणि टिमने आयफोन 7 वर अँड्राईड 10 ला इंस्टॉल केले आहे. डेव्हिडने या प्रोजेक्टला सँडकास्टल असे नाव दिले आहे.

वांगने युजर्सला देखील आयफोन 7 मध्ये अँड्राईड 10 इंस्टॉल करण्याचा पर्याय दिला आहे. मात्र अँड्राईड 10 व्हर्जन केवळ आयफोन 7 आणि आयफोन 7+ वरच काम करेल. शिवाय हे अँड्राईड 10 ऑडिओ, ब्लूटूथ, कॅमेरा आणि सेल्यूलरसाठी काम करत नाही.

या प्रोजेक्ट अंतर्गत तुम्ही गुगल प्ले स्टोरवरून कोणतेही अ‍ॅप आयफोनमध्ये डाउनलोड करू शकत नाही. जर तुम्हाला आयफोन 7 सीरिजमध्ये अँड्राईड 10 इंस्टॉल करायचे असल्यास तुम्ही ProjectSandcastle.org वर जाऊ शकता.

रिपोर्टनुसार अ‍ॅपलने मागील वर्षी कॉपीराइट आणि सिक्युरिटी व टेस्टिंगसाटी आयफोनचे सॉफ्टवेअर बनविल्याचा आरोप करत वांगच्या स्टार्टअप विरोधात खटला दाखल केला होता.

Leave a Comment