चीनमधून सुरू झालेल्या कोरोना व्हायरसचा प्रसार जगभरात झाला आहे. भारतात देखील आतापर्यंत 29 जणांना याचा संसर्ग झाला आहे. या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येक देशातील सरकार प्रयत्न करत आहेत. आता या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी दक्षिण कोरियाने एक मोबाईल अॅप लाँच केला आहे.
कोरोनाबाबत अलर्ट करणार हा अॅप
दक्षिण कोरियाच्या एका सरकारने Corona 100m नावाने एक मोबाईल अॅप लाँच केला आहे. हा अॅप 100 मीटरवरूनच कोरोना व्हायरसबाबत युजर्सला अलर्ट करेल. हे अॅप गुगल प्ले स्टोरवर मोफत उपलब्ध आहे.
कोरोना 100एम हे अॅप लोकेशननुसार अलर्ट पाठवते. उदाहरणार्थ, जर एखाद्या भागात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेला रुग्ण आढळला असेल, तर त्या भागात जाण्याआधी अॅप तुम्हाला अलर्ट करेल.
हे अॅप कोरोना व्हायरसचा अलर्ट देण्यासाठी coronavirus.app सारख्या ग्लोबल वेबसाइटच्या आकड्यांचा वापर करते. गुगल प्ले स्टोरवरून आतापर्यंत 10 लाखांपेक्षा अधिक जणांनी या अॅपला डाउनलोड केले आहे. याआधी चीन आणि जपानने देखील कोरोना व्हायरसचा अलर्ट देणारे अॅप लाँच केले आहेत.
