जाणून घ्या वाहनातील सुरक्षा फीचर ABS आणि EBD विषयी

कारमध्ये मिळणारे सुरक्षा फीचर्स एबीएस आणि ईबीडीबद्दल तुम्ही ऐकले असेल. सरकारने हे दोन्ही फीचर गाडीमध्ये देणे अनिवार्य केले आहे. अखेर एबीएस आणि ईबीडी हे फीचर्स नक्की काय आहेत व हे गाडीमध्ये कसे काम करतात ? याविषयी जाणून घेऊया.

एबीएस –

एबीएसचे पुर्ण नाव अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम (Anti-lock Braking System) आहे. हे वाहनातील एक असे सुरक्षा फीचर आहे, जे बाईक अथवा कारला अचानक ब्रेक लावल्यावर स्किड (घसरण्यापासून) होण्यापासून वाचवतात व गाडीला नियंत्रित करण्यासाठी मदत करतात. यामध्ये लावण्यात आलेले वॉल्व आणि स्पीड सेंसर अचानक ब्रेक लावल्यावर गाडी अथवा बाईकची चाके लॉक न करता गाडीला विना स्किड करता थांबवते.

जगात सर्वात प्रथम एबीएसचा वापर 1929 मध्ये विमानात करण्यात आला होता. त्यानंतर 1966 मध्ये कार्ससाठी करण्यात आला.

Image Credited – qmotor

एबीएस सिस्टमचे पार्ट्स –

या सिस्टममध्ये व्हिल स्पीड सेंसर, इलेक्ट्रॉनिक कंट्रोल यूनिट आणि हायड्रोलिक सिस्टमचा समावेश असतो.

एबीएस सिस्टम कसे काम करते ?

अचानक गाडीचा ब्रेक दाबल्यानंतर ब्रेक ऑइलच्या प्रेशरने ब्रेक पॅड चाकांसोबत जोडले जातात व त्यांचा वेग कमी होतो. वेगात असताना अचानक ब्रेक दाबल्यानंतर ब्रेक पॅड व्हीलसोबत चिकटले जातात. अशावेळी एबीएस सिस्टमचे काम सुरू होते.

ब्रेक पॅड चाकांना जाम करू लागतात. त्याचवेळी स्पीड सेंसर चाकांच्या वेगांचा सिग्नल ईसीयूला पाठवतात. ईसीयू प्रत्येक चाकाच्या वेगाने आकलन करून प्रत्येक चाकाच्या वेगानुसार हायड्रोलिक यूनिटला सिग्नल पाठवतात. ईसीयूतून सिग्नल मिळाल्यावर हायड्रोलिक सिस्टम आपले काम सुरू करते. गाडीची चाके जाम होऊ लागताच हायड्रोलिक सिस्टम ब्रेक प्रेशरला थोडे कमी करतात. ज्यामुळे चाके पुन्हा फिरू लागतात व पुन्हा ब्रेक प्रेशरला वाढवून चाकांना थांबवते. खास गोष्ट म्हणजे ही प्रक्रिया सेंकदात अनेकवेळा होते व यामुळे गाडीचे व्हिल जाम होत नाहीत.

Image Credited – Amarujala

ईबीडी –

ईबीडीला इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्यूशन (Electronic Brakeforce Distribution) असे म्हणतात. ही एक अशी सिस्टम आहे ज्याद्वारे गाडीचा वेग, वजन आणि रस्त्याची स्थिती पाहून ब्रेक वेगवेगळ्या चाकांना वेगवेगळे ब्रेक फोर्स देते. अचानक ब्रेक लावल्यावर गाडी पुढच्या बाजूला दबते आणि जेव्हा एखाद्या वळणावर गाडीला वळवले जाते तेव्हा गाडीचे वजन आणि त्यावरील प्रवाशांचे वजन एका बाजूला होते. अशा स्थितीत अचानक ब्रेक लावल्यानंतर देखील गाडी नियंत्रणात राहते व स्किड होत नाही.

एबीएस आणि ईबीडी हे दोन्ही सिस्टम वेगवेगळे आहेत. मात्र वाहनात हे दोन्ही एकसोबत काम करतात, ज्यामुळे दोघांचेही नाव सोबत घेतले जाते.

एबीएस आणि ईबीडीचे फायदे –

ज्या गाडीत या दोन्ही सिस्टम असतात, त्यात अचानक ब्रेक दाबल्यानंतर देखील स्टेअरिंग कंट्रोलमध्ये राहते व हाय स्पीडमध्ये अचानक ब्रेक दाबल्यावर गाडीचे व्हिल जाम होत नाहीत. याशिवाय गाडी घसरत देखील नाही.

Leave a Comment