व्हॉट्सअॅप, फेसबुक किंवा इन्स्टाग्रामप्रमाणे ट्विटरमध्ये येणार नवे फिचर


व्हॉट्सअॅप, फेसबुक किंवा इन्स्टाग्राम ज्याप्रमाणे आपल्या युझर्ससाठी नवनवीन फिचर्स घेऊन येत असते त्याचप्रमाणे ट्विटर देखील आपल्या युजर्ससाठी एक नवे फिचर घेऊन येणार आहे. युजर्सना आता या फिचरमुळे व्हॉट्सअॅप आणि फेसबुक प्रमाणे टाइमलाइन अपलोड करता येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ट्विट एडिट करता यावे यासाठी एखादे नवे फिचर आणावे, अशी मागणी ट्विटर युजर्सकडून केली जात होती. पण कंपनी या ऐवजी एका फिचरच्या लाँचिंगसाठी प्रयत्न करत असल्यामुळे आता युजर्स ट्विटरवर केवळ ट्विट नाही तर फ्लिट देखील करू शकणार आहेत.

या आधी युजर्सना व्हॉट्सअॅप, फेसबुक किंवा इन्स्टाग्रामप्रमाणे स्टोरी टाकता येत नव्हती. त्याचा आनंद आता युजर्सला ट्विटरवर देखील घेता येणार आहे. ट्विटरवर युजरने एखादे ट्विट केल्यानंतर त्याची टाइमलाइन युजर्सना पाहता येणार आहे. ट्विटरकडून फ्लिट नावाचे एक फिचर लाँच करण्यात येणार आहे. कंपनीकडून या फिचरची चाचणी केली जात आहे. सध्या भारतात हे फिचर वापरता येत नसले तरीही कंपनी ते लवकरच लाँच करणार आहे. ब्राझीलमध्ये सध्या हे फिचर सुरू करण्यात आल्याचे कंपनीने सांगितले आहे.

एखादी पोस्ट युजरने ट्विटरवर केल्यावर ती व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामप्रमाणे टाइमलाइनवर पाहता येणार आहे. विशेष म्हणजे २४ तासानंतर हे टाइमलाइन आपोआप बंद होईल. युजर्सना ट्विटरवरील फ्लिटच्या माध्यमाने २८० शब्दांमध्ये ट्विट करता येणार आहे. ज्या अकाऊंटला युजर्सने फॉलो केले त्यांचे टाइमलाइन वेगळ्या टॅबमध्ये पाहता येणार आहे. पण यावेळी युजर्स कोणत्याही फ्लिटला रिट्विट करता येणार नाही आहे. असे असले तरीही युजर्स फेसबुकच्या स्टोरीप्रमाणे इतरांच्या टाइमलाइला रिअॅक्ट होता येणार आहे.

Leave a Comment