रिलीज पूर्वीच बॉक्स ऑफिसवर ‘बागी-३’ने रचला नवा विक्रम


रिलीज पूर्वीच अभिनेता टायगर श्रॉफच्या बहुप्रतिक्षीत ‘बागी-३’ने बॉक्स ऑफिसवर नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. दरम्यान ‘बागी-३’ आज बॉक्स ऑफिसवर झळकला असून चित्रपटाची बॉक्सऑफिसवर दमदार सुरूवात झाली आहे. Box Office Indiaच्या रिपोर्टनुसार अॅडव्हान्स बुकिंगद्वारे चित्रपटाने ५.५० कोटींची कमाई केली आहे.

या वर्षातील ‘बागी-३’ या चित्रपटाचे सर्वात जास्त अॅडव्हान्स बुकिंग झाले आहे. या चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग प्रेक्षकांसाठी गेल्या पाच दिवसांपासून सुरू करण्यात आले होते. अजय देवगणच्या ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ चित्रपटापेक्षा ‘बागी-३’ चे अॅडव्हान्स बुकिंग जास्त आहे. अॅडव्हान्स बुकिंगद्वारे ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाने ५.१८ कोटींची कमाई केली आहे.

या रिपोर्टनुसार ३० ते ४० टक्क्यांची बागी३ चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगमध्ये वाढ होऊ शकली असती.पण कोरोनाच्या भीतीमुळे चित्रपटगृहाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्यामुळे काही प्रमाणात फटका बसला आहे. अॅडव्हान्स बुकिंगद्वारे सुमारे ८ कोटी कमाई चित्रपटाची होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला होता.

Leave a Comment