हा आहे जगातील सर्वात मोठा लग्नाचा गाऊन, जो केला आहे या खास प्रयोजनासाठी


फ्रान्सने आपल्या नावे एक असा विक्रम कायम केला आहे, जो आपल्याला आश्चर्यचकित करू शकतो. फ्रान्सने जगातील सर्वात लांब लग्नाचा गाऊन (ड्रेस) तयार केला आहे. त्याची लांबी ८०९५ आहे. बांधकाम कंपनी डायनामाइट प्रोजेक्टसने १५ कारागिरांच्या मदतीने दोन महिन्यांत हा ड्रेस तयार केला आहे. त्याचबरोबर त्यांनी यासह मागील रेकॉर्ड तोडले आहे. यापूर्वी जगातील सर्वात लांब ड्रेस १२०३.९ मीटर लांब होता.

फ्रान्सच्या कॉड्री या शहरा ड्रेसचे अनावरण करण्यात आले. ११ वर्षांनंतर या शहराने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे. यावेळी ड्रेसची लांबी मोजण्यासाठी केबिनेट कारोन ब्रिफॉर्ट फर्मचे प्रोफेशनल परीक्षक क्रिस्टॉप ड्युमोंट आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे रॉब मलोय उपस्थित होते. ज्यांनी याचे मोजमाप केल्यानंतर या कंपनीला प्रमाणपत्र दिले. हा लग्न ड्रेस एका विशेष उद्देशासाठी बनविला गेले आहे. आता या ड्रेसला अनेक भागांमध्ये कापले जाईल आणि पुन्हा विकले जाईल. मग ती रक्कम धर्मादाय संस्थेला दान केली जाईल.

Leave a Comment