ह्या पदार्थांच्या अतिसेवनाने उद्भवू शकतात कर्करोगासारखे गंभीर आजार


कर्करोगासारखे गंभीर आजार केवळ धूम्रपान केल्याने, मद्यपान केल्याने किंवा तंबाखूचे सेवन केल्यानेच फक्त होतो अशी सर्वसाधारण समजूत असते. पण या शिवाय देखील गंभीर आजार उद्भविण्याची अनेक कारणे असू शकतात. आपल्या खाण्यामध्ये सतत येणाऱ्या काही पदार्थांच्या अति सेवनाने देखील गंभीर आजार उद्भवू शकतात.

पॉपकॉर्न म्हटले की पूर्वीच्या काळी वाळूमध्ये भाजल्या जाणाऱ्या लाह्यांची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. पण आताच्या इंस्टंट जमान्यामध्ये पॉपकॉर्न देखील इंस्टंट असावे लागतात. त्यातूनच गरज निर्माण झाली मायक्रोवेव्ह मध्ये तयार होणाऱ्या पॉपकॉर्नची. तयार पॉपकॉर्न च्या मिश्रणाचे पॅकेट मायक्रोवेव्ह मध्ये घालता क्षणीच काही मिनिटांच्या अवधीत गरमागरम पॉपकॉर्न तयार. पण ह्या पॅकेट मधील पॉपकॉर्नचे मिश्रण घातक ठरले असून, त्यामुळे फुफ्फुसाचा कर्करोग होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. मायक्रोवेव्ह मध्ये जेव्हा हे पॅकेट गरम होते, तेव्हा त्यामधून अनेक घातक रसायने बाहेर टाकली जातात. ही रसायने पॅकेटमध्ये असणाऱ्या पॉपकॉर्न मधील तेलामध्ये किंवा लोण्यामध्ये मिसळली जाऊन शरीरास नुकसानकारक ठरू शकतात.

आजकाल वेळेअभावी अनेक लोक घरामध्ये रेडीमेड अन्नाचे किंवा हवाबंद अन्नाचे डबे आणून ठवून, जेवण्याच्या वेळी त्या डब्यांमधील अन्न काढून, मायक्रोवेव्ह मध्ये गरम करून खातात. कामाची धावपळ असणारे, किंवा एकटे राहणाऱ्या लोकांना ताजा स्वयंपाक करून खाण्यापेक्षा रेडीमेड पॅकेज्ड अन्न घरी आणून ठेवणे आणि भूक लागली की ते अन्न गरम करून खाणे , हा पर्याय सोपा, आणि कमी वेळ लागणारा वाटत असतो. पण अन्न पॅक केले जाणाऱ्या या स्टील किंवा मेटल च्या डब्यांमध्ये शरीराला हानिकारक असे BPA असून, यामुळे गंभीर आजार उद्भवू शकतात.

रिफाईन्ड साखरेच्या अति सेवनाने देखील गंभीर आजार होऊ शकतात. त्याचबरोबर फ्रुक्टोजची जास्त मात्रा असणारे कॉर्न सिरप देखील शरीराला हानिकारक आहे. तसेच अन-रिफाइन्ड साखरेमध्ये देखील कृत्रिम रंग आणि फ्लेवर घातले जातात. हे रसायने देखील शरीरास घातक ठरू शकतात. त्यामुळे साखरेच्या ऐवजी शक्यतो शुध्द मधाचा वापर करणे अधिक चांगले. त्याचप्रमाणे कार्बोनेटेड पेये देखील शरीराला हानिकारकच, यामध्ये अति प्रमाणात असलेली साखर, अतिरिक्त फ्लेवर्स इत्यादी पदार्थांपासून शरीराला नुकसान होऊ शकते.
https://27x3sk1jp4383ciecw14gkz1-wpengine.netdna-ssl.com/wp-content/uploads/2016/07/edible-oil-feature-image.jpg
निरनिराळ्या खाद्य तेलांच्या जाहिराती आपण सतत टीव्हीवर पाहत असतो. अनेक आरोग्यदायी गुणांनी ही तेले युक्त आहेत असा दावा ह्या जाहिरातींमधून केला जात असतो. ह्या जाहिरातींना बळी पडून आपण निरनिराळी खाद्यतेले आवर्जून खरेदी करीत असतो. पण ही खाद्यतेले अनेक रासायनिक प्रक्रियांद्वारे तयार केलेली असतात. ह्या प्रक्रियांच्या द्वारे तेलाचा नैसर्गिक स्वाद देखील बदलला जातो. त्यामुळे खाद्यतेलाची निवड करताना रिफाइन्ड तेलांच्या ऐवजी ‘ फिल्टर्ड ‘ तेले वापरा. तसेच आपल्या आहारामध्ये तळलेल्या पदार्थांचे सती सेवन देखील आरोग्याला हानिकारक आहे. त्यामुळे हृदयरोगासारखे विकार उद्भवू शकतात. त्यामुळे तळलेल्या पदार्थांचे सेवन माफक प्रमाणात करावे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment